"दिनचर्या"

गुरुवार, २० जानेवारी, २०११ | लेखक » विशाल तेलंग्रे
रात्री:

दुपारी अमोलसमवेत गुलमंडीतल्या उत्तम उपहार गृहात गरमागरम भजी अन् जलेबी खाल्ली.
---
★ सायंकाळी ती अन् "ती" अशा दोघी आज घरी आल्या होत्या, सोबतच गाजराचा हलवा खाल्ला आम्ही. (शेवटचा असेल बहुधा. ☹ )
---
⊠ येण्या-जाण्यात विनाकारण वेळ वाया घालवण्यापेक्षा म्हटलं थेट सोमवारीच कॉलीज-वारी करावी, तूर्तास दांडी! नाहीतरी केवळ दोन लेक्चर्स होतात; पैकी एक निव्वळ बोर-छाप!
---
☑ "ममं"चे ट्रान्सलेशन इज इन प्रोग्रेस, भुंग्या दादाने कालच डॉट पो फाइल मेलली ✉ होती. (सद्यस्थिती: २८% कम्प्लीट)
---
विश्वास पाटलांचे "पानिपत" निम्मे काळे होत आले आहे. (शब्दशः अर्थ अभिप्रेत नाही.)
---
आता झोपतोय. हं शक्य झाल्यास टर्मिनेटरचा दुसरा भाग पाहीन, पहिला बघितला होता काही दिवसांपूर्वी, कोननच्या आईची आणि भविष्यकालीन कोननचा मित्र असलेला गीझ यांची थरारक प्रेमकहाणी ♥ एकदम मस्त! ८० च्या दशकात टेक्नॉलॉजी वाटत होती त्यापेक्षा बरीच पुढे गेली होती तर... दुसऱ्या भागात काय होते, हे पाहण्यास तसा मी उतावीळ आहेच, पण आरामदेखील तितकाच महत्त्वाचा! बघतो, काय करायचे ते... O_o
» नोंद-प्रकार: ,
अनामित म्हणाले...

" सायंकाळी ती अन् "ती" अशा दोघी आज घरी आल्या होत्या, सोबतच गाजराचा हलवा खाल्ला आम्ही. ☻ (शेवटचा असेल बहुधा. ☹ )"

another apsara episode in making?

विशाल तेलंग्रे म्हणाले...

;) फार वेळ लागेल; प्रसंगी काहीही साध्य होणार नाही—असं घडण्याचीच संभवनीयता अधिक आहे.

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे