सकाळी:
काल रात्री "दि पीसमेकर" हा रशियन चित्रपट बघितला, पाहताना अतिशय रोमांचक वाटला.
रशियाची सुमारे दहा अण्वस्त्रे चोरुन त्यांना सर्बिया मार्गे इरानमध्ये पाठवण्यात येते. अण्वस्त्रे चोरतानाचा थरारक प्रसंग पाहताना अंगावर अगदी काटा येतो. केवळ पैशासाठी आपल्याच राष्ट्राच्या सैनिकांना कूटनीतीने रेल्वेतच ठार करुन त्यांच्याकडे असलेली अण्वस्त्रे घेऊन रशियन जनरल कॉडोरॉफ परांगदा होण्यात यशस्वी होतो. यासुमारास त्याच रेल्वेत एक अणुबॉम्ब कॉडोरॉफने ट्रिगर द्वारे सेट करुन ठेवलेला असल्यामुळे आणखी एका रेल्वेशी तीची टक्कर होऊन सुमारे १५०० सामान्य लोकांचा त्यात बळी जातो. या घटनेचा उहापोह करताना रेल्वेत अणुबॉम्ब टायमरने सेट करुन ठेवला असल्याचं व्हाइट हाउस न्युक्लिअर एक्स्पर्ट डॉ. जुलिआ यांच म्हणणं असतं. तथापि रशियाच्या स्पेशल फोर्सेस चा कर्नल थॉमस याला कॉडोरॉफवर शंका येते. नंतर बर्याच हेरगिरी व छोट्या-मोठ्या चकमकींनंतर उपग्रहांच्या छायाचित्रावरुन डॉ. जुलिआ व थॉमस हे कॉडोरॉफला लोकेट करण्यात यशस्वी होतात. त्यांना इरानच्या सरहद्दीवरच थॉमस अडवून ८ आण्विक अस्त्रे ताब्यात घेतो पण ९ असायला हवे असल्यामुळे त्यापैकी १ गायब झालेले असते. त्या १ अण्वस्त्राचे पुढे काय होते, हे अनुभवण्यासाठी चित्रपट पाहणेच योग्य राहील! अॅडव्हेन्चर, थ्रिल, रोमांच, इमोशन्स इत्यादी सर्वकाही या चित्रपटात आहे. फक्त चित्रपटातील एकदम क्लायमॅक्स थोडा न पटण्यासारखा आहे, पण एकूणच चित्रपटामधील धाडसी दृश्ये बघण्याची संधी दवडणे योग्य ठरणार नाही! :)
माझ्याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी vishaltelangre.com या संकेतस्थळास भेट द्या.
अरे काय टोरेंट लिंक वगैरे द्यायची पद्धत आहे की नाही!
दिग्दर्शकाचा नाव काय? अभिनेते कोण? काय??
@आल्हाद,
ह्म्म बरोबर आहे! ह्या इथे माहिती बघ: http://www.imdb.com/title/tt0119874/
;)
अच्छा हं आठवला पिक्चर... एका मोठ्या चर्चमधे हे क्लूणीसाहेब बॉम्ब डिफ्यूज करतात असा पाकाव शेवट आहे ना...
फालतू आहे... रशियनच्या भूमिकेतला मस्त आहे पण.
@आल्हाद,
ह्म्म... चर्चमध्ये बॉम्ब अकार्यक्षम(शील) करण्याचं काम डॉ. ज्युलिआ करते.
प्रतिसाद नोंदवा: