शीर्षकावरुन काय प्रतित होतंय? :P ही चार जणांची नावे, स्नेहा, स्वाती, महेश, सचिन—परीक्षेमुळे या चौघांचे वाढदिवस साजरी करणं असंच रखडलं होतं, पण आज ते करायचंच असं ठरलं (क्रेडिट गोज टू स्नेहल, अॅज आय थिंक सो.). केकवर टाकण्यासाठी वरील नाव मीच सुचवलं होतं! ;)
दौलताबादनजीकचा H2O वॉटर पार्क—हिवाळा असूनही सगळे जण (कृष्णा अन् दिलीप वगळता) पाण्यात मनसोक्त बागडले, उड्या मारल्या, रेन डान्स काय, इत्यादी सर्वकाही अगदी फुल्ल टू धम्माल! शिल्पा देखील शेवटी न राहावून पाण्यात उतरलीच! ;) च्यायला आशुला पोहोता येतं पण अमोल नि मी, नाही जमत आम्हाला! स्वाती तोंडावर पडली, दात तोडून घेतला पोरीनं. प्राजु वरुन आली अन् खाली काय थेट पाण्यात, सचिन अन मी सावरलं होतं तीला. :( अविस्मरणीय दिवस.
डावीकडून यल्लो टी-शर्ट घातलेला ऐटीत उभा असलेला मी! |
सचिन अन् महेश कडची पार्टी पोस्टपॉन् झाली, तीन चार दिवसांकरता, ओरल एक्जाम आटोपते तोपर्यंत.
---
संध्याकाळी थोडा वेळ दिपक कडे थांबलो, भाऊने ११ वी पासून हातात असलेली माझी सोनाटाची घड्याळ मारली, त्याची तेव्हापासूनच नजर होती. मी कुठे सोडतोय त्याला इतक्या सहजा-सहजी, दुगना लूँगा!
त्याने नुकतेच खरेदी करुन आणलेले काळे जॅकेट मी ट्राय करुन बघितले, खाली त्याचे फुटूज्:
प्रतिसाद नोंदवा: