एक्जाम स्टार्टिंग...

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०१० | लेखक » विशाल तेलंग्रे
रात्री:

डोळे जळजळ करताहेत. कारण सुद्धा तसंच आहे, नेहमीचंच रडगाणं—पूर्ण सेमिस्टरभर अभ्यास केला नाही, तो अख्खा आज सकाळी सव्वा नऊवाजेपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत करुन मोकळा झालो... आत्ताच दिवसभरात काढलेल्या नोट्स रीव्हाइज केल्या. उद्या पेपर आहे. पेपर निघावा, एवढं तरी लिहिता आलं तरी पुरेसं असेल, तशी त्यादृष्टीनेच तयारी केलीय.

संध्याकाळी खिचडी खाल्ली. पण कितीही खाल्ली तरी पोट भरेनाच, भाताचं हे असंच असतं... रात्री पोट ठिकाणावर राहावं असं चिंतन करतो.

आता मस्तपैकी एखादा पिक्चर पाहायचा मूड होता, पण डोळे झोपेसाठी आसुसलेत. झोपायलाच हवं, तसंही सकाळी किंचित लवकर उठावं लागणार आहेच. :)
» नोंद-प्रकार: , ,

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे