एक दिवस शिल्लकची सुट्टी असल्याकारणाने आजचा दिवस छानपैकी युटिलाइज केला. कित्येक दिवसांपासून एखादा मस्त फोटोब्लॉग बनवावा, असं नेहमी वाटायचं, आज ती इच्छा माझी मीच पूर्ण केली. फोटोब्लॉगचं काम अगदी शेवटच्या टप्प्यांत आहे, परीक्षा संपल्यानंतर राहिलेलं काम उरकून लगेच तो प्रदर्शित करेन. सध्या तो [येथे ] बघण्यासाठी उपलब्ध आहे.
बाकी म्हणावं तितकं काही काम नाही झालं आज. हं,
hping3
वापरुन एखाद्या लक्ष्यित होस्टला सेकंदाला १० किंवा जास्त रीक्वेस्ट्स पाठवून त्याला गांगरुन टाकण्याचा यशस्वी प्रयत्न मात्र केला. टार्गेट काय असणार, युनिव्हर्सिटीची वेबसाइट! ;) बरं तरी मी हे करत असताना तिकडून तीच वेबसाइट उघडताना कोणाला शंका आली नसावी की, सालं हे "The connection has timed out: The server at http://bamua.digitaluniversity.ac/ is taking too long to respond." कशामुळे येतंय ते, DoS अॅटॅक तर नाही?:P
एनिवे मी जरी कधीच कसल्याही गोष्टीचं टेन्शन घेत नसलो तरी यावेळी साहजिकच थोडं का होईना पण दडपण आहेच. पिच्चर पहावा का आज??? ह्म्म... दि इटालियन जॉब आहे, बघूनच घ्यावा म्हणतो, उगाच टेन्शन नको, काय! :P
प्रतिसाद नोंदवा: