अनियतकालीन नोंद

रविवार, ३० जानेवारी, २०११ | लेखक » विशाल तेलंग्रे
रात्री:

आठवडाभरात:

- पीटी एज्यु च्या $%*ऽ$॑ मास्तरानं अख्खा आठवडा हैराण करुन सोडलं. उद्या तो आणखी काय करेल, तोच जाणे!
- शिवाजी (गटकळ) काकांकडे बराच वेळ गेला, वेब "पोर्टल" तयार करण्याचा प्लॅन आहे—विदाउट सीएमएस!
- दहावीला ज्या शाळेत होतो, तिथल्या मुख्याध्यापिका मेधा मॅडमचा फोन आला होता—शाळेसाठी सॉफ्टवेअर्स डेव्हलप करण्याबाबत बोलल्या—सुट्ट्यांमध्ये तयार करण्याचं मी आश्वासन दिलं. (योगाने—मराठी सिनेतारका निशिगंधा वाड यांच्या हस्ते बक्षिस स्विकारताना माझा काढलेला फोटो अजुन शाळेतच आहे—तो तरी मिळेल! )
- आज कटिंग करण्याचं राहूनच गेलं...
» नोंद-प्रकार:
Anonymous म्हणाले...

हे मस्त आहे रे.... असेच प्रोजेक्ट वगैरे करत बिल गेटस मोठा झाला. तू पण तसाच हो !
आयला, आम्ही कॉलेजमध्ये असताना असला उत्साह कधीच नव्हता आम्हाला. आहे त्या assignment जीवावर आल्यासारख्या करायचो. म्हणून तर आज US client बरोबर लुब्रा बनून शिफ्ट मध्ये ड्युटी करतो आहे. तू मात्र Steave Jobs किंवा Bill Gates चा आदर्श ठेव हो !

विशाल तेलंग्रे म्हणाले...

अरे माफ कर, पण खरं सांगायचं झालं तर एवढी ऐपत नाहीये माझी, ना ही तशा प्रकारचे स्वप्ने पाहण्याची! :)

तरीदेखील तुझ्या प्रोत्साहनपर प्रतिसादाबद्दल आभार. मी जे काय करतोय, त्यातून मला समाधान लाभतंय—एवढंच पुरेसं!

आणि हो, केवळ सखोल ज्ञान ग्रहण करण्यासाठी मी सदैव भूकेला असतो—या सर्व गोष्टींमागचे मूळ!

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे