प्रथमच!

मंगळवार, ८ मार्च, २०११ | लेखक » विशाल तेलंग्रे
सकाळी

सगळं एन्चॉयरमेंट अनोळखी. कुठे तरी वर शिड्या चढताना माझ्याच मित्र-मैत्रिणींचा एकदमच गलका होतो. मी त्यांच्या गलबलाटाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं. ते ज्या मुलीचं नाव घेऊन ओरडत होते, ती अचानक माझ्या पुढ्यात येऊन ठाकते अन् सगळ्यांचा उत्साह अगदी शीगेला पोहोचतो. एकाएकी माझ्यासमोर येऊन थांबलेल्या अतिशय सुंदर, सालस युवतीकडे पाहून माझ्या डोळ्यांची पारणे फिरतात, माझ्या चेहऱ्यावरील हाव-भाव देखील तसेच आश्चर्यचकित करणारे दिसतात.
ती विचारते, "विशाल, फारच खराब झालाहेस हं तू. तब्येत सुधारायला हवी आता! ;)"
मी, "तू ... आहेस ना?"—माझा प्रश्न.
ती, "हं! :)"
मी, ":)"

पुढे आमच्या प्रेमाला अंकूर फुटतात अन् ती माझी जीवन संगिनी बनते. :)

---

आज पहाटे पहाटे, झोपेतून उठण्याच्या काही सेकंद अगोदर मला पडलेलं हे स्वप्न! फार काय, मित्र सोडून सगळं नवखं. असं स्वप्न प्रथमच पडलं हे मात्र नक्की! बाय द वे, ती युवती कोण होती, मला तीचं नाव कसं ठाऊक, तीला मी पूर्वीपासून कसा ओळखत होतो, ती कशी दिसत होती, इत्यादी इत्यादी—सगळे प्रश्न अनुत्तरीत!
बाय द वे, सिग्मंडचं या "अशा" स्वप्नांच्या बाबतीतत असलेलं महत्त्वाचं "ऑर्ग्युमेंट" आता खरं वाटायला लागलंय.

---

कित्येक दिवसांपासून कॉलीजला स्पोर्ट इव्हेंट्स त्यानंतर गॅदरिंग इत्यादी समारोह चालू होते, आजपासून नियमित लेक्चर्स चालू होताहेत—सो कॉलीजला जावं लागणार आज!
» नोंद-प्रकार:

दिवस असे की...

रविवार, १३ फेब्रुवारी, २०११ | लेखक » विशाल तेलंग्रे
रात्री:

सकाळी #GATE चा पेपर देऊन आलो--बर्‍याच दिवसांनंतर आज जरा लवकरच उठणं झालं होतं. पेपर सोपा होता--पोरं म्हणत होते असं.
---
आज पुन्हा प्रयत्न करून बघितला, पण माझ्या अंगी "खासीयत" म्हणता येईल अशी कुठलीच बाब नाही--जरा स्पष्टच सांगायचं झालं तर तशी स्ट्रॅटेजी मला वापरता येत नाही--परिणामी मी ती आजवर अंगिकारली सुद्धा नाहीये. असो, अशा लहान-सहान गोष्टींमध्ये गुंतून पडलो तर माझं मलाच सुधरणार नाही--मान्य आहे की मोठाल्या आकांक्षांच्या आड अशा प्रकारच्या काही आत्मविश्वास ढासळवणार्‍या क्षुल्लक प्रसंगांना मी लगेच बळी पडतो--केवळ मनात कुठेतरी ठिणगी पेटलेली राहते, ज्यामुळे पुन्हा उभं राहण्याचं मला सामर्थ्य प्राप्त होतं. ठीक आहे ना, पण हारी हुई लडाई खेळण्याचं प्रयोजनच मुळात बावळटपणाचं लक्षण आहे...
तू तिकडे आनंदात रहा, मी माझा इकडे राहतो--आशा आहे की यापुढे आपली योगायोगानेसुद्धा भेट होणार नाही. असं लिहितांना अंतःकरणात गहिवरून गेल्यानंतर कसं राहून-राहून वामल्यावानी त्रास होतो, तसं काहीसं फील करतोय.
» नोंद-प्रकार:

व्यत्यय

शनिवार, ५ फेब्रुवारी, २०११ | लेखक » विशाल तेलंग्रे
सकाळी:
 
गेल्या काही दिवसांपासून छंद पुरवण्यासाठी (दुसरा काय असणार—वाचन आणि वाचन!) वेळ काढणंच अशक्यप्राय होऊन बसलंय. जरी रुपयाची मिळकत नसली तरी देखील ज्या कामात मी जुंपलोय ना, ते माझ्यासाठी तरी नक्कीच पर्वणी आहे. मुळात कॉलीजसंबंधी कामांचा (आय मीन लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स इ.) व्याप एवढा आहे ना हल्ली की त्या चालून आलेल्या पर्वणीमध्ये लक्ष घालायला सुद्धा पुरेसा वेळ मिळत नाहीये! :( येण्या-जाण्यातच बराचसा वेळ खर्ची जातो—ह्म्म, तेवढ्या काळात, कसे का होईना पण 'पानिपत' थोडे-थोडे काळे* होत आहे. तरीही मस्त चाललंय सर्वकाही—सुरळीत नाही म्हणता येणार तरीही! ;)

* ~ शब्दशः अर्थ अभिप्रेत नाही.
» नोंद-प्रकार:
विशाल तेलंग्रे