प्रथमच!

मंगळवार, ८ मार्च, २०११ | लेखक » विशाल तेलंग्रे
सकाळी

सगळं एन्चॉयरमेंट अनोळखी. कुठे तरी वर शिड्या चढताना माझ्याच मित्र-मैत्रिणींचा एकदमच गलका होतो. मी त्यांच्या गलबलाटाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं. ते ज्या मुलीचं नाव घेऊन ओरडत होते, ती अचानक माझ्या पुढ्यात येऊन ठाकते अन् सगळ्यांचा उत्साह अगदी शीगेला पोहोचतो. एकाएकी माझ्यासमोर येऊन थांबलेल्या अतिशय सुंदर, सालस युवतीकडे पाहून माझ्या डोळ्यांची पारणे फिरतात, माझ्या चेहऱ्यावरील हाव-भाव देखील तसेच आश्चर्यचकित करणारे दिसतात.
ती विचारते, "विशाल, फारच खराब झालाहेस हं तू. तब्येत सुधारायला हवी आता! ;)"
मी, "तू ... आहेस ना?"—माझा प्रश्न.
ती, "हं! :)"
मी, ":)"

पुढे आमच्या प्रेमाला अंकूर फुटतात अन् ती माझी जीवन संगिनी बनते. :)

---

आज पहाटे पहाटे, झोपेतून उठण्याच्या काही सेकंद अगोदर मला पडलेलं हे स्वप्न! फार काय, मित्र सोडून सगळं नवखं. असं स्वप्न प्रथमच पडलं हे मात्र नक्की! बाय द वे, ती युवती कोण होती, मला तीचं नाव कसं ठाऊक, तीला मी पूर्वीपासून कसा ओळखत होतो, ती कशी दिसत होती, इत्यादी इत्यादी—सगळे प्रश्न अनुत्तरीत!
बाय द वे, सिग्मंडचं या "अशा" स्वप्नांच्या बाबतीतत असलेलं महत्त्वाचं "ऑर्ग्युमेंट" आता खरं वाटायला लागलंय.

---

कित्येक दिवसांपासून कॉलीजला स्पोर्ट इव्हेंट्स त्यानंतर गॅदरिंग इत्यादी समारोह चालू होते, आजपासून नियमित लेक्चर्स चालू होताहेत—सो कॉलीजला जावं लागणार आज!
» नोंद-प्रकार:
Yogesh म्हणाले...

मनी वसे ते स्वप्नी दिसे ... :)

प्रेमात पडला आहेस का?

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे