रात्री:
सकाळी #GATE चा पेपर देऊन आलो--बर्याच दिवसांनंतर आज जरा लवकरच उठणं झालं होतं. पेपर सोपा होता--पोरं म्हणत होते असं.
---
आज पुन्हा प्रयत्न करून बघितला, पण माझ्या अंगी "खासीयत" म्हणता येईल अशी कुठलीच बाब नाही--जरा स्पष्टच सांगायचं झालं तर तशी स्ट्रॅटेजी मला वापरता येत नाही--परिणामी मी ती आजवर अंगिकारली सुद्धा नाहीये. असो, अशा लहान-सहान गोष्टींमध्ये गुंतून पडलो तर माझं मलाच सुधरणार नाही--मान्य आहे की मोठाल्या आकांक्षांच्या आड अशा प्रकारच्या काही आत्मविश्वास ढासळवणार्या क्षुल्लक प्रसंगांना मी लगेच बळी पडतो--केवळ मनात कुठेतरी ठिणगी पेटलेली राहते, ज्यामुळे पुन्हा उभं राहण्याचं मला सामर्थ्य प्राप्त होतं. ठीक आहे ना, पण हारी हुई लडाई खेळण्याचं प्रयोजनच मुळात बावळटपणाचं लक्षण आहे...

तू तिकडे आनंदात रहा, मी माझा इकडे राहतो--आशा आहे की यापुढे आपली योगायोगानेसुद्धा भेट होणार नाही. असं लिहितांना अंतःकरणात गहिवरून गेल्यानंतर कसं राहून-राहून वामल्यावानी त्रास होतो, तसं काहीसं फील करतोय.
प्रतिसाद नोंदवा: