'मराठी मंडळी'वर लेखन करण्यासाठी निमंत्रण

गुरुवार, १६ डिसेंबर, २०१० | लेखक » विशाल तेलंग्रे
mm_logo.pngकेवळ काही महिन्यांपूर्वीच खास मराठी ब्लॉगर्सच्या आग्रहास्तव चालू करण्यात आलेले 'मराठी मंडळी' हे संकेतस्थळ अगदी थोड्या कालावधीतच आंतरजालावर लोकप्रिय झाले. सुंदर, विलोभनीय व साजेसा लेआउट, विविध विषयांशी अनुसरून संपादकांनी लिहिलेले अविशिष्ट लेख, तांत्रिक अडचणी मांडण्याकरता व त्यांचे निरसन होण्याकरता सर्वांसाठी बनवले गेलेले [चर्चासत्र ], चर्चासत्रावरील नोंदणीकृत सदस्यांचे ब्लॉग्ज् [मराठी मंडळी ब्लॉगर्स ] वर जोडण्यासाठी असलेली सुविधा या व इतर अनेक सुविधांमुळे 'मराठी मंडळी' ला आंतरजालावर मोठा वाचकवर्ग लाभला.

काही दिवसांपासून प्रशासक मंडळातील काही सदस्यांना असे वाटत होते की सर्वसामान्य वाचकांना देखील 'मराठी मंडळी'वर लेखक म्हणून सदस्यता घेता यावी व त्यांना त्यांचे लेखन प्रदर्शित करता येण्याची सुविधा उपलब्ध असावी. सर्वांशी चर्चा-विनिमय करुन ही सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सकारात्मकपणे होकार मिळाला. ह्याच निर्णयाची लोकांना माहिती व्हावी या उद्देशाने हा लेख लिहिला आहे. आंतरजालावरील सर्वांना 'मराठी मंडळी' लेखन करण्यास निमंत्रित करीत आहे.

आपल्याला जर मराठी मंडळीवर लेखन करण्याची इच्छा असेल आणि म्हणूनच 'मराठी मंडळी'वर लेखक होण्यासाठी नोंदणी सुविधा उपलब्ध व्हावी, असे वाटत असेल, तर [ह्या मुळ लेखावर ] प्रतिसाद नोंदवून तसे कळवावे. आपल्यासारख्याच इतर वाचकांच्या प्रतिसादांवर विचार-विनिमय करुन ही सुविधा दिनांक १ जानेवारी, २०११ पासून उपलब्ध करुन देण्यात येईल!
» नोंद-प्रकार:

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे