अनभिज्ञ

शनिवार, १८ डिसेंबर, २०१० | लेखक » विशाल तेलंग्रे
दुपारी:


सुमारे अर्ध्या तासापासून मी घरात येरझार्‍या घालतोय, ही बाब लक्षात येऊन देखील आणखी दहा-एक मिनिटं येरझार्‍या घालण्याचं काम अविरतपणे चालू होतं. विचारचक्रात गर्क असताना मला अगदी कसलेच भान राहत नाही, याची प्रचिती येण्याची ही कितवी वेळ असावी, हे सांगता येणं अवघड आहे. आंतरजालावर एखाद्या पक्ष्याप्रमाणे स्वच्छंद न् मनसोक्त विहार करणं हा तर माझा आवडता छंदच, त्यात आज [हा ] किस्सा वाचला आणि डोळे तरारले. बहुधा त्यामुळे सगळं वाचून झाल्यानंतर लगेचच मी खुर्चीवरून उठलो आणि विचारचक्रात मग्न होऊन वरील कृती केली असावी. शेवटी पायांना जाणवणार्‍या वेदना मस्तकापर्यंत प्रवाहीत झाल्या तेव्हा कुठे स्वतःला आवरून मी खाली बसलो व हे टंकायला सुरुवात केली. असे नेहमी घडणारे प्रसंग बरेचदा अचल असतात, कधी कुठे भरकटवतील, काहीच थांगपत्ता लागत नाही.

---

काही तासांपूर्वी कृष्णाचा फोन आला होता, त्याच्या बोलण्यावरून त्याला "ये जो चल रहा है..." प्रकरण त्याच्या थोबाड-पुस्तकावर कळल्याचे समजते. दिलीपदेखील काल तसंच काहीसं बोलत होता.

---

थोडा वेळ गाणी ऐकावं म्हणतो.
» नोंद-प्रकार: , ,

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे