इन्सेप्शन

गुरुवार, ३० डिसेंबर, २०१० | लेखक » विशाल तेलंग्रे
सायंकाळी:

इन्सेप्शन रीलीज झाल्यानंतर ट्विटरवर बरेच दिवस ट्रेंडिंग टॉपिक्स मध्ये तो नेहमी दिसायचा, पण पिक्चरची स्टोरीलाइन काय आहे, हे मात्र मला काल रात्री तो पाहूनच कळालं! मागे लिहिलेल्या [विचित्र स्वप्नानुभवा]सारखीच "स्वप्नात स्वप्न" स्टोरी असणारा हा चित्रपट! पाहण्यासाठी माझ्याकडून रेकमेंडेड, मस्ट सी!

डॉम कॉब जो की चित्रपटाचा कथानायक आहे व त्याची टीम हे मोठ्या उद्योगपतींच्या मनात असणारी काही मौल्यवान गुपिते आणि विचार चोरण्याचे काम करतात. यासाठी ते हवी असलेली माहीती थेट चोरत नाहीत तर एक नवी संकल्पना लक्ष्यित व्यक्तिच्या स्वप्नांत घुसून पेरण्याचे काम करतात. ही नवीन संकल्पना एका नव्या स्वप्नरंजित जगाला जन्म देते व येथून कॉब व त्याच्या टीमचे काम चालू होते. अनेक थरांपर्यंत स्वप्नांत स्वप्ने पाहत जाऊन ते हवी असलेली माहीती मिळविण्यासाठी जीवाची बाजी लावतात.

जे विरोधाभास स्वप्नांत जाणवतात, त्यांपैकी काहींचे योग्य पद्धतीने नीरसन झाल्याने हा चित्रपट मला तृप्त करणारा वाटला. स्वप्नातील स्वप्नाचा कालावधी अधिक खोलवर गेल्यावर त्याप्रमाणे वाढत जातो, हे पटले. खोलवरच्या स्वप्नातून आधीच्या स्वप्नात अथवा वास्तवात उठण्यासाठी "किक्"ची गरज असते, हा प्रवाद देखील मान्य. एकूणच आपल्या आपणहून घडवलेल्या स्वप्नांच्या छटांत लक्ष्यित ऑब्जेक्टला आणून त्याच्या सुप्त मनातील (subconscious mind) गूपिते हेरण्याचे प्रयोजन असलेला हा अतिशय रोमांचक चित्रपट पाहताना एखाद्या रोलर कोस्टरमध्ये बसल्यावर वाटते तशाच काहीशा प्रकारे क्षणा-क्षणाला बदलणारी चित्रे व कथानक अनुभवण्याचा अद्‍भूत प्रसंग तुमच्या हृदयाची स्पंदने कमी-अधिक करेल हे निश्चित, हं पण त्यासाठी तुम्ही स्वतः "सायको" असल्याचं स्वतःला भासवायला तरी हवंच—अन्यथा पिक्चरची मजा म्हणावी तितकी लुटता येणार नाही. ;)

रात्री अगदी कान लावून पाहिल्यावर सुद्धा बर्‍याच गोष्टी अजून उमगलेल्या नाहीयेत, आज परत एकदा हाच पिक्चर पाहणार आहे. पिक्चर पाहताना सबटायटल्स असणे गरजेचे आहे, कारण यातील सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतच्या सर्व संभाषणांतील एकन्-एक वाक्य महत्त्वाचे आहे.

चित्रपटाबद्दल आणखी माहीतीसाठी: [http://www.imdb.com/title/tt1375666/ ]

या चित्रपटातील मला आवडलेली काही संभाषणे:
Cobb: Never recreate places from your memory. Always imagine new places!
Cobb: Dreams feel real while we're in them. It's only when we wake up that we realize something was actually strange.
Cobb: I can access your mind through your dreams.
Cobb: The seed that we planted in this man's mind may change everything.
Cobb: You create the world of the dream, you bring the subject into that dream, and they fill it with their subconscious.
Ariadne: How could I ever acquire enough detail to make them think that its reality?
Cobb: Well dreams, they feel real while we're in them, right? It's only when we wake up that we realize how things are actually strange. Let me ask you a question, you, you never really remember the beginning of a dream do you? You always wind up right in the middle of what's going on.
Ariadne: I guess, yeah.
Cobb: So how did we end up here?
Ariadne: Well we just came from the a...
Cobb: Think about it Ariadne, how did you get here? Where are you right now?
Ariadne: We're dreaming?
Cobb: You're actually in the middle of the workshop right now, sleeping. This is your first lesson in shared dreaming. Stay calm. [अरियाऽ ला स्वप्नांबद्दल कॉब वरील माहीती सांगतो.]
Arthur: Quick, give me a kiss!
[अरियाऽ आर्थरला किस करुन आजूबाजूला पाहते]
Ariadne: They're still looking at us.
Arthur: Yeah, it's worth a shot. [फिशरशी कॉब हॉटेलात बोलत असताना आर्थर आणि अरियाऽकडे येणारे-जाणारे लोक टक लावून पाहतात, तेव्हा आर्थर तिला किस घ्यायला सांगतो.]
Mal: You're infecting my mind!
Cobb: I was trying to save you.
Mal: You betrayed me, but you can still make amends. You can still keep your promise. We can still be together, right here. In the world we built together.
Cobb: I miss you more than I can bear, but we had our time together. I have to let you go. [मालला अरियाऽ चित्रपटाच्या उत्तरार्धात बंदूकीने गोळी मारते, त्या अगोदरच मालनेदेखील कॉबला चाकूने भोसकलेले असते.]
Mal: If I jump, would I survive?
Cobb: A clean dive, perhaps. Mal, what are you doing here?
Mal: I thought you might be missing me.
Cobb: You know I am but I can't trust you anymore.
Mal: So what?[माल एका उंच इमारतीच्या खिडकीत बसून कॉबला तिच्यासह खाली उडी मारण्याचे सांगते. कॉब नकार देतो. मालने उडी मारण्याअगोदरच कॉबने मला खाली लोटले, अशी नोट लिहून ठेवलेली असते.]
Ariadne: I just want to understand.
Ariadne: Wait, whose subconscious are we going through exactly? [जरा गोंधळलेल्या स्वरात]
Arthur: So, once we've made the plant, how do we go out? Hope you have something more elegant in mind than shooting me in the head?
Cobb: A kick.
Ariadne: What's a kick?
Eames: This, Ariadne, would be a kick
[आर्थर बसलेला असतो, त्या खूर्चीला धक्का मारुन एमेज् अरियाऽला समजावण्याचा प्रयत्न करतो.]
Arthur: [स्वतःला सावरत एमेजला लोटतो.] ["किक्" काय असते, हे अरियाऽला समजावून सांगतानाचा हा स्मित हास्य करायला भाग पाडणारा चित्रपटातील एकमेव प्रसंग!]


---


आज डोकं जरा भणभणल्या सारखं होतंय—सर्दी हे कारण तर आहेच; पुष्पराज दादासोबत थोडं बोलल्यानंतर कुठे डोकं शांत झाल्यासारखं वाटतंय! हे पोस्ट मी सकाळी ११ वाजता लिहायला हातात घेतले होते, आता कुठे सायंकाळच्या ४ ला पूर्ण करुन झालेय! :P
» नोंद-प्रकार: ,

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे