दि अनइनव्हाइटेड आणि व्हर्च्युऑसिटी

रविवार, २८ नोव्हेंबर, २०१० | लेखक » विशाल तेलंग्रे
काल रात्री दोन हॉलिवूडपट पाहिले... अतिशय रोमाचंक होते दोन्ही सुद्धा, पाहताना मजा आली अगदी...


दि अनइनव्हाइटेड:
आजारी आईच्या मृत्यूनंतर अॅना, जी एक अल्पवयीन तरुणी मानसिकदृष्ट्या अतिशय दुर्बल होऊन जाते. एका सायकियाट्रिक कडे १० महिन्यांची ट्रीटमेण्ट घेऊन अॅना घरी परतते... बीचलगत एकांतात असलेले तीचे टुमदार व अतिशय भव्य घर, त्यात ती, तीची समवयीन सुंदर बहिण अॅलेक्स, आणि पुर्वी तीच्या आईची नर्स म्हणून काम करणारे रॅचेल समर्स आणि तीचे लेखक असलेले वडील राहत असतात. अॅनाला दिवस-रात्र स्वप्ने पडतात, त्यात तीची आई तीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते आहे, असे तीला दिसत राहते.  नंतर अॅनाला कळते की समर्स आता तीची सावत्र आई होणार आहे, प्रसंगी समर्सनचे तीच्या आईला, शिवाय पुर्वी लहान तीन मुलांना मारल्याची घटना तीला कळते. अॅलेक्ससुद्धा तीची मदत करते. नंतर अतिशय रोमांचक प्रसंग आहेत. अतिशय थरारक प्रसंगांमुळे बर्‍याच ठिकाणी थरकाप उडतो पाहताना... सस्पेन्स सगळ्यांत शेवटी कळतो...

व्हर्च्युऑसिटी:
व्हर्च्युअल रीअॅलिटी, इन्टरॅक्टिव्ह रीअॅलिटी, नॅनो टेक्नॉलॉजी, सुरुवातीला कॉमेडी, नंतर अॅक्शन, अॅडव्हेन्चर सर्व काही एकाच चित्रपटात पाहणे म्हणजे मस्तच! सायन्स फिक्शनवर आधारित!
» नोंद-प्रकार: , ,

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे