फाइट क्लब

सोमवार, २९ नोव्हेंबर, २०१० | लेखक » विशाल तेलंग्रे
काल रात्री सायकोलॉजिकल विषयावर आधारित आणखी एक हॉलिवूडपट—"फाइट क्लब" पाहिला.

निद्रानाश आणि ऑफिसमध्ये बॉसचा अमानुष मानसिक अत्याचार, आणि विकॄत मनःस्थितीमुळे निवेदक पुरता हैरान झालेला असतो, त्याला सर्व गोष्टींची अगदी चीड येत असते. असंच एकदा प्रवास करत असताना त्याला टायलर डर्डन नावाचा साबण विक्रेता भेटतो. दोघांचे विचार मिळतात व ते फाइट क्लबची सुरुवात करतात. निवेदकाला नंतर कळून चुकते की टायलर दुसरा कोणी नसुन तो स्वतःच आहे, डबल पर्सनॅलिटी डिसऑर्डरमुळेच त्याने त्याच्यातला अंतर्गत राग व्यक्त करण्याकरता आणि जी कामं (मायलासह सेक्स वगैरे) तो स्वतः करु शकत नाही ते नकळत टायलर बनून तो करत होता. टायलरने तो जिथे पण जाईल, तिथे फाइट क्लब स्थापून त्यांतील सहभागी लोकांची प्रवृत्तीच सांगकाम्यासारखी बदलवून टाकली होती. शेवटी स्वतःलाच गोळी मारुन निवेदक टायलरला नष्ट करतो. मानसिक समतोलत्व बिघडलेली व्यक्ती काय करु शकते, याचे यथार्थ चित्रण व प्रसंगनिर्मीती या चित्रपटाद्वारे फॉक्स न्युज मिडीयाने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

पिक्चरमध्ये ड्रामा, कॉमेडी, थ्रिल, अॅक्शन, सस्पेन्स, रहस्यमय प्रसंग या गोष्टी तर एवढ्या आहेत, की जागच्या जागी पाहणारा स्वप्नांमध्ये हरपून जाईल!

उत्तरार्धात टायलरने निवेदकाच्या तोंडात जेव्हा बंदूक धरलेली असते, तेव्हा निवेदक म्हणतो:
दि मुवी गोज् ऑन, अॅण्ड नोबडी इन दि ऑडियन्स हॅज एनि आयडिया.

ज्यांना मानसशास्त्र, स्वप्नदोष, गंभीर नाटक इत्यादींसारख्या गोष्टींमध्ये रस नाही, त्यांना हा चित्रपट अतिशय कंटाळवाणा वाटू शकतो.
मी तरी आजवर पाहिलेला हा सर्वोत्तम चित्रपट आहे.
» नोंद-प्रकार: ,

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे