ए इयर विदाउट रेऽन्...

सोमवार, २९ नोव्हेंबर, २०१० | लेखक » विशाल तेलंग्रे
सायंकाळी:

जरी लिनक्स वापरकर्ता असलो तरी महत्वपूर्ण डेटाचा सावधगिरी म्हणून बॅकअप घेण्यासाठी आज अख्खा दिवस खर्ची घातला! कंटाळा येऊ नये आणि विरंगुळा म्हणून सीलीना गोमेझचा नवीन म्युझिक अल्बम "ए इयर विदाउट रेऽन्" आज सकाळपासून आतापर्यंत ऐकत होतो. दिवसभरात सर्वांत जास्त म्हणजे किमान ४० वेळा तरी (!) त्यातील "ए इयर विदाउट रेऽन्" हेच गाणं मी ऐकलं... त्यातील सीलीनाची प्रियकराबद्दलची तळमळ आणि एकूणच तीचा मंत्रमुग्ध करुन टाकणार सौम्य व मधुर आवाज, सर्व काही बेस्ट आहे! गाण्यातील हे ध्रुवपद मला अतिशय आवडले:
I'm missing you so much
Can't help it, I'm in love
A day without you is like a year without rain
I need you by my side
Don't know how I'll survive
A day without you is like a year without raaaaaain...

"राउंड अॅण्ड राउंड" हे याच अल्बममधील तीनं गायलेलं गाणं देखील मला खूप आवडलं! बाकी अभ्यासाबद्दल बोलायचं झालं तर रात्री थोडाफार करण्याचा विचार केलाय... ;)
» नोंद-प्रकार: , ,

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे