सर्दी :(

मंगळवार, २१ डिसेंबर, २०१० | लेखक » विशाल तेलंग्रे
रात्री:

सर्दी, घशाची खवखव या नको असलेल्या दुखण्यांमुळे अगदीच बेहाल आहे. नाक शिंकरुन-शिंकरुन लाल पडलंय, आग होतेय नाकाची! डोकं पण जड होऊन सुन्न झाल्यासारखं वाटतंय. आज प्रॅक्टिकल व्हायवा प्लस डेमो होता, काय हालत झाली असेल माझी कॉलेजमध्ये, मलाच ठाऊक! :(
मम्मीनं रेड लेबलच्या जागी दुसराच चहा-पुडा आणल्यानं यावेळी इम्युन सिस्टीमवर जरा लवकरच अॅटॅक झाला, असं राहून-राहून वाटतंय, असो. ठीक आहे, माझे ऑफस्प्रिंग्ज माझ्या अनुभवांमुळे अगदी तंदरुस्त बनून येतील! ;) फुरफुरत वेळ दवडणं म्हणजे सहनशीलतेच्या पलीकडचं आहे. मी औषधी घेत नसतो, हे त्यात महत्वाचं. सकाळी घशाची खवखव कमी करण्यासाठी नको-नको करत स्ट्रेप्सिल घेतलीच होती, आता आणखीनच वाढलीय. :(

आता झोपतो...
» नोंद-प्रकार:

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे