स्वार्थी मन!

बुधवार, २२ डिसेंबर, २०१० | लेखक » विशाल तेलंग्रे
रात्री:

सिग्मंड फ्रॉइडबद्दल हल्ली कुठेही वाचनात आलं की मन हवेत भरकटल्यावाचून रहातच नाही. दिवास्वप्नं म्हणावीत की स्वार्थी विचार, हेच कळत नाही. पूर्वी कधीतरी "ज्युरास्यिक पार्क" हा फालतू पिक्चर बघितला होता, तसाच काहीसा प्रसंग लागोलाग सजवून मला त्यात नायकाची भूमिका मिळते, ही खरे तर आश्चर्याची बाब असावी. पण शेवटी योगायोग म्हणावा की भलतंच दुसरं काही, पण अगदी माझ्या मनासारखंच होतं (स्वप्नस्थ असताना देखील मनाचा माझ्यावर अंकुश असतो, ही मोठी आश्चर्यचकित करणारी बाब!). सगळ्यांचच मन स्वार्थी विचार करतं का, ते ज्याचं आहे, त्याला नेहमीच फायदेशीर असतं की अपायकारक किंवा तसं काही नसतं—प्रश्न असंख्य आहेत, वाट चुकल्याची चुणूक भासते आहे. असं कितीवेळा नरमाईनं घ्यायचं बरं? मन ही आपल्यापासून विभक्त असणारी आणि आपल्यावरच नेहमी प्रभावीपणे स्वार होणारी एखादी दुसरी अदृश्य गोष्ट आहे काय? पर्सनॅलिटी डिसऑर्डरमागचे मुळ आणि हे प्रकरण जोडणारा अंधुक दुवा मला जाणवतोय, तसा तो अस्तित्वात आहे का, की सिग्मंडनंतर या विषयावर कोणी संशोधन केलेलंच नाहीये?

:)

---

आज डीबीएमएसची प्रॅक्टिकल एक्जाम प्लस व्हायवा होता, अनपेक्षित पण सुखावह म्हणता येईल असा प्रकार आज घडला. उद्याच्या जावाच्या व्हायवाची तयारी उद्याच करेन म्हणतो, आता झोपायच्या विचारात आहे.
» नोंद-प्रकार: ,
sharayu म्हणाले...

आपल्या मनोव्यापाराला लैंगिक प्रेरणा कारण आहेत हे सिग्मंड फ्रॉइडचे म्हणणे पटण्यासारखे नाही. माझ्या मते स्वतःला प्रस्थापित करणे ही मानवाची प्रमुख गरज आहे. लैंगिक प्रेरणा आणि स्वार्थ हे त्या गरजेचे फक्त अविष्कार आहेत

विशाल तेलंग्रे म्हणाले...

@ शरयु,

सिग्मंडचे हस्तलिखित "सेक्सोपॅथॉलॉजी" किती वादग्रस्त आहे, याची मला प्रचिती आहे; मुळात कुठल्याही मनोविकृतीचा लैंगिकत्वाशी संबंध असणे मला देखील पटत नाही. स्वार्थाच्या बाबतीत मी माझ्यादृष्टीने माझ्या बाबतीत आत्मनिरीक्षण प्रकट करण्याचा वरील नोंदीत प्रयत्न केला आहे.

अनामित म्हणाले...

अरे एक्स्प्लेन रे एक्स्प्लेन!

विशाल तेलंग्रे म्हणाले...

@ आल्हाद,

मन स्वार्थी असते, हे माहीत आहे; पण स्वप्नांत देखील त्याच स्वार्थी मनाचा आपल्यावर किती प्रभाव असतो, याचा तुलादेखील अनुभव आला असेलच, तसंच काहीसं काल रात्री घडलं होतं. सिग्मंडने स्वप्नांचा संबंध थेट पूर्वी दबून गेलेल्या लैंगिक भावनांशी जोडला होता, त्याचं म्हणणं होतं की ह्याच पूर्णत्वास न पोचलेल्या लैंगिकत्वाशी संबंधित घटना/सबबी बऱ्याचशा स्वप्नांचे मूळ असते.

अनामित म्हणाले...

मनी वसे ते स्वप्नी दिसे ही म्हण इथे बरोबर लागू पडते. फक्त लैंगिक भावनाच स्वप्नांमागे असतात असं म्हणणं चूक ठरेल. कदाचित फ्रॉईडला, माणसं सेक्सविषयीच जास्त फॅंटसाईज करतात असं सुचवायचं असेल...

विशाल तेलंग्रे म्हणाले...

हं, अगदी तसंच! :)

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे