सेमिस्टर एन्ड!

गुरुवार, २३ डिसेंबर, २०१० | लेखक » विशाल तेलंग्रे
रात्री:

आज सेमिस्टर एन्ड डे होता, अंदाजे जानेवारी १० पर्यंत सुट्ट्या असतील! जॅकेट घ्यायचं म्हणून संध्याकाळी अमोल सोबत औरंगपुर्‍यात गेलो पण मनासारखं नाही सापडलं तिकडे—जसं की दिपक कडे आहे, म्हणून ते नंतर घ्यायचं असं ठरवलं. आज काय माहीत असं का, पण दोघेही जरा जास्तच एक्साइट झाल्यासारखे वागत होतो—उत्तम उपहारगृहात गरमागरम इम्रती, जिलेबी, भजी खाल्ल्यानंतर पैठण गेटवर झक्कासऽ पैकी चहा प्यायलो. घरी आल्यानंतर पोटात वाढच नव्हती—तसंही खीर, पुर्‍या, दोडक्याची भाजी यापैकी काहीच आपल्याला आवडत नाही, सकाळच्या शिळ्या भाजीसोबत कशीबशी एक पुरी खाल्ली नाही म्हणून! ;)

---

सकाळी जावाचं प्रॅक्टिकल, खीखीऽखीऽऽ! व्हायवासुद्धा खीखीऽखीऽऽ! :P म्हणजे अगदी मजेत! :D
---

परवा सचिन अन् महेश त्यांच्या बर्थडेची कम्बाइन पार्टी देणार आहेत, आपली तर खाण्याची चंगळ आहे ऐन ख्रिसमसलाच! ;)
» नोंद-प्रकार: ,

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे