जूमला!

शुक्रवार, २४ डिसेंबर, २०१० | लेखक » विशाल तेलंग्रे
रात्री:

छानपैकी झोप काढावी असं दिवसा-ढवळ्या वाटण्याचा प्रसंग आज मी पहिल्यांदाच अनुभवला; एरवी प्रत्येक क्षणाची काळजी वाहणारा मी आज एवढा कसा आळशांडलो होतो, ते कळालेच नाही. सुट्ट्या म्हणाव्यात की लाइट नसण्याची सबब, त्यातल्या त्यात सर्दी, थंडी, अस्वस्थता—काहीतरी कारण मनाशी पक्के करुन अंगावर जर्किंग् चढवून मस्तपैकी दुपारी २ ते सांयकाळी ६ अशी झक्कासऽ झोप काढली. ह्म्म, जरा विचित्र वाटलं पण अशा फालतू गोष्टीकरीता डोक्याला ताण देणं टाळलं. सर्दीमुळे डोक्यावर अतिरिक्त ताण तसा बराच जाणवतो आहे, तरीही डोकं नेहमीपेक्षा जरा शांत अन् हलकं वाटतंय आता.

---

बर्‍याच वेळापासून [जूमला! ] वर प्रयोग करतोय. लोकलहोस्टवर इन्स्टॉल करुन 'जूमला!' ची कार्यप्रणाली समजावून घेणं अतिशय सोप्पं आहे, याचप्रमाणे वर्डप्रेस, ड्रुपल यांचाही पुढील काही दिवसांत असाच अभ्यास करायचा, असं ठरवलं आहे. 'जूमला!' ग्रेट मुक्त स्रोत अॅप आहे, हे कळायला फार काळ लागला नाही. आजची रात्र त्याच्यासाठीच द्यायची, असा निर्णय घेतलाय—प्लग-इन्स, टेम्प्लेट्स, साइट ऑथोरायझेशन, डेटाबेस आणि एफटीपी जोडणी, इत्यादी इत्यादी गोष्टी जाणून घेण्यासाठी व त्या स्वतः लाइव्ह बदल-करुन, पडताळून पाहण्याकरीता बराच वाव आहे!

गुड नाइट! :)
» नोंद-प्रकार: ,

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे