शूटर

रविवार, २६ डिसेंबर, २०१० | लेखक » विशाल तेलंग्रे
सकाळी:

काल रात्री उशीरापर्यंत "शूटर" हा अॅक्शन व थ्रिलर अन् गूढकथा असणारा मस्त हॉलिवूडपट बघितला. हं, बघण्यासारखा आहे.

चित्रपटातील नायक बॉब ली स्वॅगर हा अमेरिकेच्या इथिओपियामधील एका गुप्त युद्धात सामील असणारा एक सैनिक असतो, त्याच युद्धात त्याने त्याच्या मित्राने गमावलेले असते. स्वॅगर अतिशय चाणाक्ष व तरबेज निशाणेबाज असतो; आपल्या सैनिक-मित्राला मारणाऱ्या हेलिकॉप्टरला काही मैलांच्या अंतरावरुनच एका स्नायपर रायफलच्या मदतीने कोसळवताना त्याच्या मनात अमेरिकेविषयी, खासकरून त्यावेळच्या राष्ट्राध्यक्षांविषयी खूप तीव्र तिटकारा निर्माण होतो. या घटनेच्या सहा वर्षानंतर कर्नल जॉन्सन स्वॅगरला राष्ट्राध्यक्षांना ठार मारण्याकरता आपल्यात सामील करुन घेतो. योजनेप्रमाणे केवळ दोन आठवड्यांच्या काळात राष्ट्राध्यक्ष ज्या तीन शहरांना भेटी देतील, तेव्हा त्याच काळात त्यांना ठार मारण्याचे ठरलेले असते; त्याप्रमाणे स्वॅगर त्याच्या परीने तयारी करतो. पण ऐन वेळेवर आपल्याला फार मोठ्या चक्रव्यूहात गुंतवले गेले असल्याचे स्वॅगरच्या लक्षात येते. तो लगेच तिथून पळ काढतो. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आणि खर्‍या अपराध्यांना शिक्षा करण्यासाठी स्वॅगरची व त्याला मदत करणाऱ्या इतर दोघांची ही थरारक आणि रोमांचक कथा पाहणे म्हणजे ग्रेटच!

एका ठिकाणी स्वॅगर हे वाक्य उद्‍गारतो, "आय अॅम जस्ट ए पीकरऽवूड व्हू लिव्ह्ज् इन दि हिल्स विथ टू मेनी गन्स."

चित्रपटाबद्दल आणखी माहितीसाठी: [http://www.imdb.com/title/tt0822854/ ]

---

काल दिवसभर सिटीत उंडरत होतो. सकाळी सच्या न् म्हयशाची पार्टी होती, दाबून हाणलं तिकडं विथ स्पेशल लस्सी! नंतर दिपकच्या क्लासमेट्सना थोडंफार लिनक्सचं वरवरचं सांगून त्यांना हवेत उडवलं! (ते कसं, मलाच माहीत!) ;) दिप्यासोबत जॅकेट घ्यायला गेलो, पण दोन हजारांचं अतिशय आवडलेलं जॅकेट घेणं परवडलं नसतं—स्वस्तातले पटले नाहीत, त्यामुळे तसंच हात हलवत घरी आलो.
» नोंद-प्रकार: ,

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे