पुरे झाल्या सुट्ट्या आता...

शुक्रवार, १४ जानेवारी, २०११ | लेखक » विशाल तेलंग्रे
संध्याकाळी:

 मागच्या सेमिस्टरच्या परीक्षा संपून पार महिना होत आलाय, हं तसं कॉलीज आता सुरू झालं असेल देखील. पण ग्रुपमधले सगळे मित्र-मैत्रिणी सोमवारपासून रेग्युलर जॉइन करणार आहेत म्हणे, मग मी एकटंच जाऊन कशाला नाहक घोडं मारावं म्हणून अगदी मनात असूनसुद्धा कॉलीजला जायचं टाळलं. मग काय, कंटाळा-कंटाळा, काय दिवस आहेत, शिटऽऽ! असं कधी कोणाच्या बाबतीत घडू नये.

हं पण खरं सांगायचं झालं तर—हे केवळ गेल्या एक-दोन दिवसांपूर्वीपासूनच वाटायला लागलंय मुळात.

 
सतत काहीतरी वाचत राहण्यामुळेच थोडंफार उल्हसित व्हायला होतं, पण म्हणावी तशी आसक्ती (मग ती कुठच्याही बाबतीत का असेना) हल्ली जाणवत नाही. तथापि, विश्वास पाटलांचे "पानिपत" इंटरेस्टिंग आहे, बरंच काळं केलंय (शब्दशः अर्थ घेऊ नये).
» नोंद-प्रकार: ,
विशाल तेलंग्रे म्हणाले...

अनपेक्षित घडणाऱ्या अगदी क्षुल्लक सबबीमुळे देखील कंटाळ्याचे सावट मावळून काहीतरी करण्याची तरतरी येते याची आत्ता जाणीव झाली. बाकी व्यवस्थित.

प्रतिसाद नोंदवा:

विशाल तेलंग्रे